Ad will apear here
Next
आठवलेंनी घेतली फडणवीस यांची भेट
मुंबई : सन २०११पर्यंतच्या झोपड्यांना कायदेशीर अधिकृत मान्यता द्यावी, तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये ४०० स्क्वेअर फुटांचे घर देण्यात यावे, या मागणीसाठी  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली.

‘सन २०११च्या झोपड्यांना अधिकृत मान्यता देण्यासाठीचा कायदा बनविण्यात आला असून, मान्यतेसाठी कायद्याचा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर २०११च्या झोपड्यांना कायदेशीर मान्यता देण्यात येईल,’ अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी आठवलेंना दिली; तसेच या योजनेत किमान ३० ते ४० मीटरपर्यंतचे घर देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून, जेथे शक्य आहे तेथे ४०० स्क्वेअर फूट घर देण्याचा निर्णयसुद्धा शासनाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आठवलेंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला दिली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZOEBN
Similar Posts
‘२०१९पर्यंत ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना घर देणार’ मुंबई : ‘जनधन योजनेच्या माध्यमातून मोठे काम हाती घेण्यात आले असून, गरिब, आदिवासी लोकांना बँकेच्या कक्षेत आणण्याचे काम आपल्या पंतप्रधानांनी केले; तसेच ज्यांना घर नाही अशा १२ लाख कुटुंबांपैकी चार लाख कुटुंबांना घर देण्यात आले आहे. २०१९पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक बेघर कुटुंबाला घर दिले जाईल,’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिले
‘मुंबई सेंट्रल टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या’ मुंबई : ‘भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस देण्यात यावे,’ अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. या मागणीसाठी लवकरच रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
मुख्यमंत्री-शिवसेना पक्षप्रमुखांची सदिच्छा भेट मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गुरुवारी (२३ मे २०१९) मुंबईत लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी भेट झाली.
‘डॉ. पानतावणेंचे औरंगाबादमध्ये स्मारक उभारणार’ मुंबई : ‘आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, ज्येष्ठ विचारवंत, पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दिवंगत पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांनी दिलेल्या योगदानाच्या स्मृती चिरंतन जोपासण्यासाठी औरंगाबाद येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल,’ अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language